Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

santosh selukar

Abstract

3  

santosh selukar

Abstract

तीन प्रतिक्रिया

तीन प्रतिक्रिया

1 min
271


एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला

एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून

ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,

“माहीत नाही मजला

मी जगलो कसा अन मेलो कसा

आलो तसाच गेलो

ना वाटले जगावे ना वाटले मरावे”


त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो

दुपार होईपर्यंत …

तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण

बोलता बोलता म्हणाला “दिसत नसले जरी

मृत्यूच्या गावाट घर माझे;

याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे

वास्तव्य आहे असा होत नाही ”


विचार चक्राने मगक तर अधिकच

वेग घेतला… सावल्या विखरून गेल्या

पक्षी घरट्याकडे परतायला लागलेले.

नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून

बसलेला एक जण दिसला;

तसा माझ्याकडे पाहून हसला

हसत हसतच म्हणाला, “जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे

धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे”


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract