तीचा अट्टहास..
तीचा अट्टहास..
तीच्या अंर्तरात्म्यातुन आवाज आला
ती म्हणाली एक कविता माझ्यावर करुन पाठव मला..
आजच काय झाल नेमक
माझ्या कवि मनाला...
शब्दच सुचत नाहीये
कवितेच्या माळेत गुंफायला
परी म्हणु का सखी
सखी म्हणुका स्वप्नातली प्रीया
मैत्रीण म्हणुका का नेमके काय म्हणु?
शब्दांच्या जाळ्यांनी घेरलय मला...
पण तु आहे एक निरागस हस्य
तुझ्या नजरेत जडलय काही रहस्य
तुझ्या हट्टात मैत्रीची भावना
तुझ्या मनातला एक कोमल पणा
तु एक सुंदर कल्पना
तुझी देवाला काय प्रार्थना?
अशिच हसत रहा
अशीच हस्य उमलवत रहा
आनंदी ठेव स्वताला
व सुखी ठेव मनाला
शब्द सुचनार नाही सांगुन मला
हीच कविता समज व
वाचुव शांत कर तुझ्यातील श्रोत्याला...

