ती
ती
तुला पाहताना मन
माझे मोहरून जाई
जिकडे तिकडे आयुष्यात
तूच नजर येई...
पाहता तुला कित्येकदा
चोरून हसताना
नसत मला कशाचेही
भान तुला पाहताना...
सकाळच्या त्या वातावरणात
पक्षी मनसोक्त गाऊ लागले
तूला पाहताना माझे
हृदयाचे ठोके सुरु झाले
गालावरची खळी तुझ्या
वेढ मला लावायची
दिवसाची सुरुवात तुला
पाहण्यात जायची
तुला पाहताना ते दिवस
वाऱ्यासारखे निघून गेले
शेवटी तुला भेटायचे
मनातच राहुन गेले...
खुप सुंदर दिसायची तू
तुला बघताना सहज तुझ्या प्रेमात पडलो ..
आज स्वतला च विसरलो ...
वेळ निघून गेली ...तू
आता खूप दुर ...निघुन गेली
मला , माझ्या प्रेमाला पार विसरून गेली...

