STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract Others

4  

काव्य चकोर

Abstract Others

ती

ती

1 min
249

डोईवर ठेवून घडा

ती

अनेक दगडं चुकवत

भविष्याचा माग काढत

वर्तमानात चालत असता,

अचानक एका वळणावर

तिची भेट

सहहृदयी संवेदनेशी झाली

अन् ती

नखशिखांत भिजली

कारण

यमुनेचा डोह उचंबळून आला होता

आणि

तिच्या डोईवरचा तो घडा

नकळत फुटला होता..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract