"ती"
"ती"
'ती' मला होती भावली
पण कायमची जखम करून गेली
'तिने' माझ्यासोबत सुख दुःखाची देवाण घेवाण केली
पण आता मला या जगात एकाकी सोडून गेली
'ती' मला होती आवडली
पण माझी नाही झाली
'तिने' काही दिवस माझी सोबत केली
पण आता कायमची दूर निघून गेली
'ती' कित्येकदा माझ्यासोबत हसली
पण आता आयुष्यभराचे दुःख देऊन गेली
'तिने' माझ्या भावनेची जपणूक केली
पण आता कायमची आठवण ठेऊन गेली
तुम्ही म्हणाल होती तरी अशी कोण 'ती'
म्हटलं तर माझे सर्वस्व म्हटलं तर कोणीच नाही

