STORYMIRROR

Ashwini Kulkarni

Romance

3  

Ashwini Kulkarni

Romance

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ

1 min
11.5K

त्या दिवशी वातावरण काही वेगळे असावे,, 

कदाचीत इंद्रधनुष्याला ही वाटावे, यांनी आज भेटावे, 

 अचानक पाऊस खूप

 मातीचा सुगंध, 

आणि समोर तू,  

 तुझे भिजलेले रूप पाहून, 

 कावरीबावरी झालेली मी, 

 तुझ्या अत्तराचा गंध त्यात, 

 भर घाले आणखी,, 

 चोर पाउलांनी माझा समोर येऊन उभा तू,

डोळ्यातील भीती सावरत मी,, 

छत्रीच्या निमित्याने तुझा अबोल स्पर्श तो,,

 आणि माझ्या गाली आलेली लाज ही .... 

 ती संद्याकाळच होती खूप खास..... 

आता हे रोजचे चाळे मनी चाले 

जणू आजही या पावसाने यावे, 

तुझा गालावरची ओघळ पाहून 

मीच आधी लाजावे, 

तू समोर यावे आणि 

सगळे जग थांबावे,

तू मी आणि टपरी वरचा गरम चहा,

हळू ग गरम आहे पी सावकाश,, असे म्हणून हात हातात 

ती सायंकाळ होती खूप खास,, 

पण अचानक गर्दीत हरवलास, 

शोधूनही नाही सापडलास, 

तो सुगन्ध तो स्पर्श सत्य होते कि भास,,, 

ती संध्याकाळ होती खूप खास

ती संध्याकाळ होती खूप खास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance