ती सद्या कुठे आहे?
ती सद्या कुठे आहे?
ती सद्या कुठे आहे?
ती सध्या कुठे असते? नाही माहीत,
पण जगते आहे, कवितेच्या रुपात ...
ती सद्या काय करते? नाही माहीत
पण भेटते आहे, शब्दांच्या रुपात ...
ती सद्या कशी दिसते? नाही माहीत
पण दिसते आहे, मुखपृष्टाच्या रुपात ...
ती सद्या कशी भासते? नाही माहीत
पण अपूर्णच आहे, कादंबरीच्या रुपात ...
ती कधी माझी असते? नाही माहीत
पण सोबतच आहे, स्वप्नांच्या रुपात ...

