ती म्हणायची...
ती म्हणायची...
ती म्हणायची हात तुझा, हातीच असला पाहिजे....
प्राण तुझा माझ्यात जरी, डोळ्यांत दिसला पाहिजे...
ती म्हणायची आरशाची कुंपणे, हवेत माजघराला....
चूकलाच कोणी एक .. तरी सोबत दिसला पाहिजे....
ती म्हणायची वेलींनाही, सताड गंध आपुला पाहिजे...
बागडणाऱ्या त्या फुलपाखरांनाही...छंद आपुला पाहिजे..
ती म्हणायची वेदनांवर माझ्या, यावा पाझर पापन्यांना....
असा दैवीनाळ तुझ्यामाझ्यात, निरंतर असला पाहिजे....
ती म्हणायची जीव दोन, परी श्वास एक आपुला....
सोबतीत तुझ्या वैकुंठी नेई मज, अशी रास एक पाहिजे....

