ती लस शोधली?
ती लस शोधली?
लसी आल्या नसा ताणून आता रे
विठू कोणी दिली आणून आता रे ?
कशी देणार लस तू खेळला तू ही
शिवाशीवं मना पासून आता रे.
दुरावासात बाळं माय दुःखी ती
विठू तू खूश ते पाहून आता रे.
विठाई मी मला तू दावतो हे की
रडे आई कशी हारून आता रे?
विषारी वार जाती धर्म हत्यारे
घरी तू आणले जाऊन आता रे
विषारी रंग माझ्या त्या मुलांना हो
तुम्ही आलात ना फासून आता रे ?
विषाणू पोसले अस्पृश्यतेचे तू
लसी दे त्यास तू शोधून आता रे
