ती आणि मी
ती आणि मी
मी कधी कधी एकटाच नदीकाठी बसायचो
तिच्या आठवणीत बेधुंद होऊन रमायचो
नदीकाठच्या झोपाळ्यावर छानपैकी झुलायचो
प्रेमाच्या त्या गोष्टी खूप खूप करायचो
कधी कधी ती धावत येऊन घट्ट मिठी मारायची
त्या मिठीतून मग हवेलाही जायला जागा नसायची
मिठी मारताना हळूच कानात I LOVE U म्हणायची
I LOVE U म्हणता म्हणता स्वतःशीच गोड हसायची
पावसाच्या सरींसारखी ती अलगद बरसायची
माझ्यासोबत भिजण्यासाठी छत्रीही घरी विसरायची
मग मात्र पावसात बेफाम होऊन भिजायची
तेव्हा मात्र तिची अदा खूप घायाळ करायची
कधी कधी मी तिच्यामध्ये इतका रमून जायचो
तिच्यात रमता रमता स्वतःमध्येच हरवायचो
तिचा विचार करता करता स्वतःलाही विसरायचो
मग मात्र तिच्या आठवणींत चिंब चिंब भिजायचो
कधी कधी ती केसाची बट हळूच बोटाने कानामागे घ्यायची
काय सांगू तेव्हा ती किती सुंदर दिसायची
बागेमध्ये माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची
कोणत्यातरी गूढ स्वप्नात स्वतःशीच हसायची

