STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

तिच्या स्वप्नांचे गाठोडे..

तिच्या स्वप्नांचे गाठोडे..

1 min
282

बांधून ठेवलेले तिच्या स्वप्नांचे गाठोडे

रोजच उघडून पहाते ती 

स्वप्न जे सत्यात उतरवू शकले नाही

ते आयुष्य रोज स्वप्नातच जगत असते ती.

पाहून गाठोडे रोजच अश्रू गाळते ती

पुन्हा बांधून ठेवून देत गाठोडे

आपल्या रोजच्या कामाला लागते ती

मन रोजच जात असते तिचे भूतकाळात

त्या गमावलेल्या संधी परत मिळणार नाहीत

म्हणून रोजच झुरत असते ती.

आणि ती एक प्रत्येक घरात असते

आपल्या माणसांनी, आपल्या लेकरांनी

पुढे जावं म्हणून तिच्या स्वप्नांना सोडून देत असते ती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational