Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Tragedy Inspirational

2  

Prashant Shinde

Tragedy Inspirational

ति... बाबांना...!

ति... बाबांना...!

1 min
147


प्रिय बाबांना....!


प्रिय बाबांना सा. न .वि .वि.

प्रश्न पडलाय मला

माझी व्यथा तुम्हाला

कशी सांगावी


शब्दात मांडली 

मनात सांडली

तरी मला कळेना

ती कशी पाठवावी


तुमचा ना आता ना पत्ता

कुठे आहात हे

शोधू तरी कसे

व्यथा मी सांगू तरी कसे


शेवटी बाबा मी

इतुकेच केले

डोळे मिटले

आणि सारे प्रश्न सुटले


प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

तुमच्या आठवणीत

तुमच्या शिकवणीत आहे

हे मला क्षणात कळले


बाबा,आता काही

जीवनात मला अडचण नाही

अडचणींवर मात करायला

आठवणी इतका रामबाण उपाय दुसरा नाही


बाबा आठवणच तुमची

जीवन पैलतीर गाठण्यास पुरेशी आहे

तुमची शिकवणच

जीवन जगण्यास खूप मोलाची शिदोरी आहे


नाव लौकिक सारा

तुमच्या शिकवणी मुळे आहे

जीवन स्थिर माझे बाबा

तुमच्या आठवणी मुळे आहे


कळावे , कृपा असावी किंवा

आपला विश्वासू वगैरे मी म्हणत नाही

कारण तुमचे अंतरातले अस्तित्व

मी नजरे आड करू इच्छित नाही


डोळे उघडतो आता 

आज्ञा असावी तुमच्या लेकराला

सदैव आशीर्वाद राहू दे शिरावरी

जीवन उज्वल उन्नत कृतार्थ होण्याला....!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy