STORYMIRROR

Nita Meshram

Tragedy

3  

Nita Meshram

Tragedy

थवा पाखरांचा

थवा पाखरांचा

1 min
11.6K

काही न बोलताही का तुझ्या डोळ्यात पाणी

पाणी ते वेदनेचे माझ्याही डोळ्यात आहे

आहे ठाऊक मला रे चिंता तुझी ती सार्थ

सार्थ या भावनांना त्यामुळेच अर्थ आहे


आहे रे दुनियेत रंक-राव दोन्ही

दोन्ही त्या जगण्याचे रंग रूप निराळे आहे

आहे हेच माणसाचे रूप खरे जगात सख्या

सख्या येतो राग जरी ते तुझे स्वगत आहे


आहे संघर्षच जीवन उभे आपले

आपले कुणी न ते सोबतीला जवळी राहिले

राहिले मी अन् फक्त तू जीवनाची आशा

आशा म्हणूनी थवा पाखरांचा पाहत राहिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy