थंडीच्या दिवसात
थंडीच्या दिवसात


थंडीच्या दिवसात
वाटते पडावे ऊन,
हुडहुडी लागते
ऊन लागावे म्हणून
थंडीच्या दिवसात
खावा खारीक लाडू,
हाेईल निर्माण ऊर्जा
गाेदडीखाली दडू
थंडीच्या दिवसात
हातपाय गारठले,
उघडयावरचा विचार
मन आता गाेठले
थंडीच्या दिवसात
उन्हाची प्रतिक्षा,
सहनशीलतेची आता
वाढवावी कक्षा