STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

थांब रे पाऊसा !!

थांब रे पाऊसा !!

1 min
230

थांब रे आता पाऊसा

जरा तरी घे उसासा

अक्राळविक्राळ रुप

घेऊनीया आला कसा!!  (1)


कर्मचारी नि विद्यार्थी 

खूप आता थकले रे

रस्त्यावरी चहूकडे

पाणीच पाणी झाले रे  (2)


वेगवान तुझा मारा

अफाटचि अचाटचि

घरी परतणारे गेले

देवाघरी अघटितचि  (3)


कृषीवल हो चिंतित

ओला दुष्काळचि आला

काय जलमय माया

धारा लागती डोळ्यांना  (4)


आता नको हस्तालागी

पिसाटल्यापरि येऊ

आता येई मृगालागी

तेव्हा स्वागतचि करु   (5)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy