Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

तेजस्वी बाहू

तेजस्वी बाहू

1 min
279


जरी दिसती हे हात रक्ताळलेले

क्रांती घडवतील ते शौर्याने

देऊनी रक्त,घेऊनी रक्त

रक्षिती आपला देश भारत----


पाडाल जर वक्रदृष्टी स्त्री वर

हा हात बनूनी तलवार

होऊनी स्रीरक्षक या भूवर

बरसेल वासनांध दुष्टावर-----


करुनी जर अत्याचार तिच्यावरी

केली तिची दुर्दशा या भूवरी

याद राखा वासनांंधानो तुम्ही

घेईन मी तुमचा बळी-----


का विसरता तुम्ही स्व माता-भगिनी

ही पण आहेना कुणाची सखी

होऊनी पिसाट करता तिची नालस्ती

आयुष्याच्या तिच्या का लावता वाट----


या दोन तेजस्वी बाहूंनी

झेलेन अलगद माझ्या भगिनीस

या दोन बाहूंचा देऊनी भककम आधार

पुन्हा उभी करेन तिला जागवूनी

स्वाभिमान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational