STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

ते दिवस आठवतात.....

ते दिवस आठवतात.....

1 min
204

*ते दिवस आठवतात     

येते डाेळ्यातून पाणी,     

गरीबीत राहूनसुध्दा      

गायचाे श्रीमंतीची गाणी*  

*ते दिवस आठवतात     

खायला नव्हते काेरकू,    

कुपाेषित बालक आम्ही   

म्हणूनच म्हणायचे बारकू*  

*ते दिवस आठवतात

गळायची आमची घरं, 

शिडात कुठे घुसायचं

आडदांडपणे हे वारं*

*ते दिवस आठवतात

शेळ्या चारत हुंदडायचाे, 

घरच्या ओढीने परत

राहुटीत येऊन बसायचाे*


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational