Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Tragedy Classics

3  

Rakesh More

Tragedy Classics

तडफड का असते

तडफड का असते

1 min
170


प्रेमात हृदयाची सतत 

तडफड का असते 

मनाची सतत अशी 

पडझड का असते || 0 ||


शांती मिळत नाही मनाला 

सतत एक दबाव असतो 

मिळण्यापेक्षा गमावण्याच्या 

जास्त तीव्र प्रभाव असतो 

आयुष्यात अशी सर्वांच्या 

गडबड का असते 

मनाची सतत अशी 

पडझड का असते || 1 ||


सतत बेचैन राहणं आणि 

चित्त नसते थाऱ्यावर 

जसं सोडून दिलंय कोणी 

आपणास वाऱ्यावर 

हृदयात सतत जीवघेणी 

धडधड का असते 

मनाची सतत अशी 

पडझड का असते || 2 ||


सतत तिचा विचार छळतो 

सतत विरहकल्पना 

काय करावं कळत नाही 

ठरती खोट्या वल्गना 

मरणाऱ्या पक्षासारखी 

फडफड का असते 

मनाची सतत अशी 

पडझड का असते || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy