STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

तडजोडीच्या बंधातले...

तडजोडीच्या बंधातले...

1 min
4

नाते तुझ्या माझ्यातले ,

कोडेच होते ते सुटले,

तडजोडीच्या बंधातले ,

बंध कायमचे तुटले ...

सुख तुझ्या भासातले ,

ना सत्यात उतरले ,

तु आलास घेऊन काटे,

जे पाऊलोपावली रुतले...

किती सहन केले मी,

आघोरी त्रासाचे खटले,

आघात करून तु ,

मलाच कटघरात उभे केले ...

हा न्याय ही व्यवस्था ,

कोण कुठे घाबरले,

मनाची फरफट चहूकडे,

माझे दुःख कुठे संपले...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract