STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

3  

Prashant Tribhuwan

Tragedy

तडजोड

तडजोड

1 min
678

तडजोड


करतोय प्रत्येकजण तडजोड

इथे नियतीशी जगण्यासाठी,

प्रत्येकाच्या पदराशी बांधल्याय

सुख दुःखाच्या गाठी!


या त्रिभुवनी जगण्यासाठी

तडजोडी शिवाय पर्याय नाही,

यशाची प्रत्येक पायरी

देते तडजोडीची ग्वाही!


कोणी करते इथे तडजोड

मिळवण्यासाठी आपला स्वार्थ,

तर कोणी भाग्यवंत म्हणोनी

त्याची तडजोड मिळवण्या परमार्थ!


अशी तडजोड करत माणूस 

किती दिवस जगणार

आपले स्वप्ने भंगताना

कितीदा आपल्याच नयनांनी पाहणार!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy