STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

3  

Prashant Shinde

Abstract

तडजोड...!

तडजोड...!

1 min
225

पाठीवरच्या फाटक्या नशिबाला

मी कधीच दोष देत नाही


परिस्थितीला दूषण देऊन

मी कधीच जीवन जगत नाही


आभाळ फाटले जरी

मी हार कधीच मानत नाही


प्राक्तनाला दोन हात करणे

मी कधीच सोडत नाही


तडजोड जीवनाशी करणे

मी माझे भाग्य कधी समजत नाही


ध्येय सिद्धीच्या यज्ञात आहुती श्रमाची

टाकण्या वाचून मी कधीच राहत नाही


कितीही संकटे आली जीवनी

मी माझा मार्ग बदलणार नाही


उत्तुंग उज्वल यशाचे शिखर

गाठल्याविना मी गप्प बसणार नाही


हीच प्रार्थना ज्ञान देवते

तुझ्या चरणी करतो आहे


दे विद्या दान मजला शारदे

हेच मागणे तुझ्या कडे करतो आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract