STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

स्वयंप्रकाशित

स्वयंप्रकाशित

1 min
200

तुझसवं काहीतरी आहे

म्हणून तो तुझा आहे

खोल विचारांती बघ

तू एकटाच आहेस...!


गुळाच्या ढेली 

झुंड माशांचा

आमदार,नामदार कडं

घोळका माणसांचा

फुलपांखरे करिती

द्रव्य शोषण पुष्पांचा

काही नसला की रं

करिती त्याग तयांचा...!


तुला वाटतं की ,

तुझे सर्वच असतं

संकटकालिन बघ

मदतीला कुणी येतं...?


ही नाती-गोती आपुलकी

फक्त वैभवा पुरते रं

दारिद्र्याचे कुणी नाही

मात्र तुम्ही एकटे रं...!


म्हणूनच हे सुजाण माणसा

ध्येय एकंच मनी...

कर्तृत्ववान असावं

यशाचं सूर्य उगवतोच

स्वयंप्रकाशित रहावं

तेजाने सन्मान येतोच...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational