STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

स्वर्गपरी

स्वर्गपरी

1 min
228

जीव माझा तुझ्यात सारा

तू मला जीवाहून प्यारी,

रंभा, अप्सरा, मेनका, उर्वशी तू

तू माझी ग स्वर्गपरी.


शब्दात काय वर्णवू मी

तुझ्या रूपाचं या वर्णन,

तुझ्या रूपाचं पडलंय ग हे,

साऱ्या धरतीवर चांदणं.


पाहून झालोय वेडा ग मी

तुझ्या या देखण्या रुपाला,

दिनरात झुरतोया मी ग

झोप येईना डोळ्याला.


काय सांगू तुझ्याविना माझं

लईच होतंय ग हाल,

रोजच येतेस स्वप्नात राणी

वेड तुझं ग मला लागलं.


वाटे घ्यावं तुला मिठीत

तुझ्या ओठाचं घ्यावं चुंबन,

तुझं माझं व्हावं मिलन

यावा सोन्याचा तो दिन.


दिलं देवानं तुला ग देणं

रंग गोरा गोरा पान,

तु तर एक नंबरी सोनं

रुपाची खरी तू ग खान.


ओठ गुलाबी,गोरे गाल

काया नाजूक, सुंदर,

नजर तिरकी,चाल मोरणी

केस उडती भुरभुर,लवलवती कंबर.


तुझ्या वर फिदा दुनिया सारी

स्वर्गपरी तू अवतरली भूवरी,

भ्रमर गुंजन करी फुलावरी

तशी माझी ग प्रीत तुजवरी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance