स्वराज्याचे धनी जन्मले
स्वराज्याचे धनी जन्मले
सुस्त, निद्रिस्त आणि परास्त जाहली
ठेवूनी गहाण स्वाभिमनी ओंजळी
जिजाऊ मनी स्वप्ने 'रामराज्याली'
बहरले स्वप्नशिल्प उदरी, धन्य जिजा माऊली
स्वराज्याचे धन जन्मले शिवनेरीच्या महाली
रायरेश्ववराच्या आर्शिवादाने दिली
स्वाभिमानाची रास पहिली
गड तोरण्यात तुतारी फुंंकली
सारी दुनिया फगव्यात न्हाहली
स्वराज्याचे धनी जन्मले शिवनेरीच्या महाली
मुघल, निजाम आणि आदिली
डच, इंग्रज तर कुठे पोर्तुगाली
त्यात अस्तिनीतली होती ' आपली '
नाश करूनी त्यांचा धारिली तु बिरूंदावली
स्वराज्याचे धन जन्मले शिवनेरीच्या महाली
क्रूर अफजलखानाची छाती फाडली
मामा शायिस्तेखानाची बोटे छाटली
उत्तम गमिनीकाव्याची मुंंडी मारली
आया बहिणीची अब्रु राखली
स्वराज्याचे धनी जन्मलेे शिवनेरीच्या महाली
जयसिंगाने घाव घातले
शौर्याची तलवार तळपली
मराठी मुलखे पुुन्हा बहरली
शिवसोहळ्याचे स्वप्नशिल्प निर्मिली
स्वराज्याचे धनी जन्मले शिवनेरीच्या महाली
