स्वप्नं पहाटेचे
स्वप्नं पहाटेचे


ते गीत कालचे अपुरे मी आज गायिले होते
पहाटे स्वप्नांत जेव्हा तुला पहिले होते
अधीर मन हे माझे, तुझ्या विश्वात गुंतलेले
एकेक भास तुझे मी, श्वासात गुंफलेले
भावनांत हरखून तुजला मी, हृदय वाहिले होते
पहाटे स्वप्नांत जेव्हा तुला पहिले होते
भावरहित या जगास सार्या, विश्वास हा नसेना
हृदय मांडते संवाद जरासा, तन दूर का असेना
हे ओघ येथल्या काळांचे, गोठून राहिले होते
पहाटे स्वप्नांत जेव्हा तुला पहिले होते
त्या यामिनीत भिजलो होतो मी शब्दांत पावसाच्या
सुगंध तुझा दरवळला तेथे, देशातूनी फुलांच्या
क्षण अगम्य या जीवनाचे, जणू सुवर्ण झाले होते
पहाटे स्वप्नांत जेव्हा तुला पाहिले होते