STORYMIRROR

TRUPTI PATIL

Children

3  

TRUPTI PATIL

Children

स्वप्नातली गंमत(बालकविता )

स्वप्नातली गंमत(बालकविता )

1 min
199

 एकदा की नाई गंमत झाली

 स्वप्नात माझ्या परी आली 

 हळद चुंबून मला म्हणाली

 चलतेस का गं माझ्या घरी

 खेळणी, चॉकलेट देईन सारी

 मी तर पटकन हो म्हणाली

 घेऊन गेली ती आभाळी

 आभाळातून फिरताना

 मजा वाटे पाहताना

 पाहता-पाहता दिसली दरी

 तेव्हाच मजा आली खरी

 मी ओरडले परी परी

 मी तर पडले पहा तरी

 माझ्याजवळ आली आई

 म्हंटली घाबरू नको बाई

 मी तर आहे तुझी आई

 आईच्या मी कुशीत गेले

 थोड्यावेळाने हसू फुटले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children