STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
331

स्वप्न जरूर पहावे

नसे कुणाचे बंधन

असंख्य येती वादळे 

घे स्वप्नपूर्तीचे वचन 


स्वप्नपूर्तीच्या ओघात 

भान ठेव स्वतःकडे 

मुर्ख म्हणती हे जग 

विचार ठेव‌ स्वप्नांच्या पलीकडे 


अशक्यप्राय स्वप्नांसाठी 

शरीर जरूर थकावं

मनाला खचू न देता 

परत धैर्याने उठावं 


अपुऱ्या स्वप्नांसाठी 

कधी नाराज न व्हावं 

उराशी नवीन स्वप्न बाळगून

विश्वासाने तयार व्हावं


स्वप्नांना आनंदाने सजवावं 

निराशेला बाजूला सारावं 

नव्या स्वप्नांच्या पूर्णतेसाठी 

शांत मनाने जगावं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational