STORYMIRROR

Varsha Pannase

Romance

3  

Varsha Pannase

Romance

स्वप्न श्रावणी 🌺

स्वप्न श्रावणी 🌺

1 min
295

सर सर सरी आली श्रावणी

स्वप्नांत माझ्या आला कुणी

बघता बघता वाट सख्याची

सुर्यकला नभी नारायणी.......

सर सर सरी आल्या अंगणी

प्राजक्त शिंपण स्पर्श मनी

आला सखा सुखी पर्वणी

लाजली कळी सरी श्रावणी.....

श्रावण सरीत चिंब भिजावे

मिठीत सख्या तूझ्या शिरावे

सुखी संसार स्वप्न पहावे

ऊन सरीचे अनुभव घ्यावे.......

आला श्रावण आली सरी

सखा श्रावण आहे लहरी

सखी सरी आकाश परी

संसार माझा सर श्रावणी........

केशर केतकी गंध तनी

थुईथुई पिसारा प्रिय मनी

श्यामल श्रावणी रातराणी

स्वप्नांत माझ्या आला कुणी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance