बालपण 🌺
बालपण 🌺
1 min
78
हरवलेलं बालपण
फारच भारी होतं
कधीच नाही मांडलं
हृदयी तिजोरीत ठेवलं........
नाही कधी पाहिलं
लहान मोठ नातं
मारा माऱ्या भांडणं
रोजचंच होतं ...........
मुलांना शहाणपण
मी शिकवत होतो
मनी माझं मला
बालपण दिसत होतं.........
आपल्यापेक्षा समजदार
मुलं आहेत आपली
रागावलो त्यांच्यावर
लाज मला वाटली...........
डोळ्यांसमोर आले
बालपण माझे
प्रश्न विचारला मनाला
मी काय केले ?.............
अश्रू आले नयनी
कशाला त्याची उजळणी
होतात चुका बालपणी
केली स्वतःची मनधरणी...........
आई बाबांची पुण्याई
वेळेवर सावरलो
खरं बालपण मी
मुलांमधेच पाहिलं.........
