कुठे हरवलं बालपण 🌺
कुठे हरवलं बालपण 🌺
1 min
35
रुणझुण रुणझुण
इवल्या पायी पैंजण
निरागस लाघवी
कुठे हरवलं बालपण ..........
दुडूदुडू चालणं
मंजूळ नाद अंगण
निरागस कोमल
कुठे हरवलं बालपण..........
राग लोभ येण्या
न लगे कारण
रुसवं निःस्वार्थी
कुठे हरवलं बालपण.........
गुलाब गाली हास्य फुले
प्रफुल्लीत तनमन
चंचल उस्फूर्त
कुठे हरवलं बालपण.....
आनंद वर्षा सदोदीत
प्राजक्त उधळण
घर वाटे नंदनवन
कुठे हरवलं बालपण........
