कविता
कविता
1 min
153
कल्पनाच ती कवी मनाची
लेखणीत बघ कशी गिरवली
जीवन रेषा आयुष्याची
पानावर मग नीट रेखली...
आकाशीचे चंद्र तारे
परी मेनका सजले सारे
स्वप्नामधले विश्वच न्यारे
कवी जगतात काव्य स्फुरे...
डोंगर माथा नदी किनारे
धरणी वैभव भरले वारे
कवी मनाचे तुटती तारे
काव्य वेडे हे वचन खरे...
