बालपणीचे क्षण
बालपणीचे क्षण
1 min
37
बालपणीचे क्षण हरवले होते
आठवणींनी मन भारावले होते
राग लोभ रुसवे फुगवे
समजतच नव्हते
हेवेदावे सगे सोयरे
सर्वच आपले होते...........
नाते गोते रक्ताचे
सोडून सारे गेले
मी होते लाडाचे
डोळ्यांसमोर आले...........
मार मिळे घडोघडी
मास्तरांची रोज छडी
रडून हसुन पकडावी
मायेनी आईची साडी...........
लहानपण माझे
मस्त मजेत गेले
आजही ते दिवस
आठवणीत आले............
गाडी बंगला स्वप्न
नव्हत्याच अपेक्षा
आई वडील आप्तगण
मोठे होते त्यापेक्षा............
मन माझे फुलपाखरू
कसे त्याला आवरु
उडते क्षण बालपणीचे
कसे ओंजळीत धरु..........
