STORYMIRROR

Varsha Pannase

Others

4  

Varsha Pannase

Others

ओवी प्रथम प्रहर 🌺

ओवी प्रथम प्रहर 🌺

1 min
649

राम प्रहरी आला राजा दिनकर दारी

हळदी गुलालानं माखली वसुंधरा सारी

झाली सडा रांगोळी दिली धन्याला न्याहरी

धनी राजा धरणीचा निघाला गं शिवारी


सुक्ष्मरुप ईश दारी आली प्रभा नारायणी

राऊळात घंटानाद पुजा पाती ओवाळणी

धूप दिप राळ सुगंध दरवळ आसमानी

धावे राऊळात मन दिसे विठ्ठल रुक्मिणी


गुरे ढोरे हंबरती जाण्यासाठी माळ रानी

दुध दुभत्याची गाय पाही धन्याला मायेनी

पशु पक्ष्यांची झुंबड चिवचिव ती गाणी

धृव ताऱ्याची गं बाई नजर काढा कोणी.......


नाही वान कशाचीच माझ्या सासरी संसारी

तरी आठवे माय बाप भाऊराया माया भारी

सासु सासरे प्रेमळ पूर मायेचा गं उदरी

तरी डोळा येई पाणी धावे मन गं माहेरी......


Rate this content
Log in