मी कवयित्री झाले
मी कवयित्री झाले
1 min
161
दु:खी सुखी माझे मन
होता दु:खाचाच ध्यास
घेतला मोकळा श्वास
लेखणी निमवी ञास
हुंदके मुक्या शब्दांची
शाई अबोल अश्रूंची
दु:खाची हळवी वाणी
गिरविली कोऱ्या पानी
साठले अंर्त मनात
जीव ओतला पानात
शब्द ते व्याकरणात
नव्हते ताला सुरात
प्रगटे दत्त ईश्वर
काव्य त्याची धरोवर
झाला माझा गुरुवर
शिकले मी तालावर
तिमीर वलय भ्रांती
ज्योत तेवली पणती
स्फुरे काव्य मंद गती
स्व काव्य प्रज्वल वाती
सभासदी आजीवन
मंचा वाहिले जीवन
झाला जन्मच पावन
आले आनंदा उधाण
काव्य भिनले हे गाञी
नहाले काव्य गंगोञी
आनंदाश्रु तेज नेञी
झाले हो मी कवयित्री....
झाले हो मी कवयित्री.......
