STORYMIRROR

Varsha Pannase

Others

3  

Varsha Pannase

Others

पाऊस

पाऊस

1 min
137

अनल मोसमी मयुर पैंजणी नाचत आला

ऊन सावली रुसुन हसती खेळ चालला

हस्त उत्तरा मघा रोहिणी नक्षत्र आला

मेघ शलाका वाजा गाजा वरुण बरसला


काळी छाया लख्ख प्रकाशी ऊन सावली

नभ हे रिझवी रंग बदलवी कमान सजली

इंद्रधनुची गंमत न्यारी भू बावरली

नाजूक हळवी धरा बावरी मोहित झाली


अवनी सारी चिंब जहाली लाजलाजली

हिरवी हिरवी तरु वेल तृण झुलू लागली

सर अंबरची कुशीत येता अवनी व्याली

अंबर धरणी प्रेमसरींनी पुलकित झाली   


रंगबिरंगी फुल पानांनी सृष्टी सजली

खग आकाशी पंख पसरून उडू लागली

शेतशिवारी धन धान्यांची दौलत आली

तृषा तृष्णा तृप्त झाली लक्ष्मी आली


Rate this content
Log in