STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

स्वछता संदेश

स्वछता संदेश

1 min
569

सारे स्वच्छतेकडे लक्ष देऊ या

समृद्धीकडे वाटचाल करू या

सुरुवात स्वतःपासून करू या

रोज स्नान करून स्वच्छ होऊ या


स्वच्छ कपडे परिधान करू या

एकवार पाहू या आपल्याकडे

पहिले घराची साफसफाई करू या

ओला सुका कचरा वेगळं करू या


कचऱ्याची अशी विल्हेवाट लावू या

जाणीवपूर्वक लक्ष देऊ कचऱ्याकडे

घराचा परिसर गाव स्वच्छ करू या

गावातील घाण सर्व दूर करू या


गावाचे नाव सर्वदूर पसरवू या

गांधीजींने म्हटले चला खेड्याकडे

शाळा परिसर स्वच्छ सुंदर ठेवू या

आनंदी वातावरणात शिक्षण घेऊ या


शिक्षणाने सर्वजण गुणवंत होऊ या

धडे घेण्यासाठी जाऊ या शाळेकडे

आपल्या स्वछतेवरून घर कळते

घरावरून गावाची ओळख होते

गाव मिळून जिल्हा प्रसिद्धीस येते

जगाचे लक्ष जाते मग देशाकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational