STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

स्वछता अभियान

स्वछता अभियान

1 min
12.1K

तीन वेळा दिवसातून चला घरातला सारा कचरा काढू

स्वच्छ आणि स्वस्थ परिवार सांगत असते सर्वांना झाडू


भल्या पहाटे अंगणात सडा संमार्जन करू रांगोळी काढा

स्वच्छ राहा नि समृद्ध राहा सांगत असते सर्वांना खराटा


गल्लीबोळात फिरून सारा केरकचरा काढते वेचुनी

स्वछता पाळा रोगराई टाळा सांगते असते सर्वां केरसुणी


एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम सांगू या नागरिकांना

स्वच्छ भारत समृद्ध भारत संदेश देऊ सर्व भारतीयांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational