STORYMIRROR

Somesh Kulkarni

Inspirational

4  

Somesh Kulkarni

Inspirational

स्वातंत्र्यवीर

स्वातंत्र्यवीर

1 min
367

जाज्वल्य अंतरीचे

दावू कुणास आता?

हा बोल मानसीचा

लावू कुणास आता?


दृढ भाव हा असे की

उद्धारु देश पुन्हा,

परि साथ सोबतीची

मागू कुणास आता?


तेव्हाच इंग्रजांशी

लढलो आम्ही कितीदा,

हे दृश्य आसमानी

गाऊ कुणास आता?


वेळेस आमुच्या रे

होते किती ते वीर,

हे चित्र पालटाया

पाहू कुणास आता?


देशास आज माझ्या

स्वातंत्र्य हे मिळाले,

स्वातंत्र्य मागण्याला

जाऊ कुणास आता?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational