STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन

1 min
273

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो

भारतीय तिरंगा फडकत राहो

सा-या विश्वात शोभतो

 उंच उंच ध्वज फडकत जावो...!!


देश रक्षिण्या दिले कित्येकांनी

आपल्या प्राणांचे बलिदान

तिरंगा आमचा प्राण आहे

तिरंगा आमची शान.....!!


मायभूची सेवा करण्या जाती

सैनिक वीर पुत्र या देशाचे

भारतीयांचा प्राण तिरंगा

सांगती महत्त्व रंगाचे.....!!


रंग केशरी सांगे आम्हा

शौर्य आणि त्यागाचे

रंग पांढरे शांतता सांगतो

हिरवा रंग हरितक्रांतीचे,समृद्धीचे...!!


अशोक चक्र सांगतो आम्हा

काम करावे चोवीस तास

आळस शत्रू झटकून टाका

सांगतो तिरंग्याचा इतिहास....!!


प्राणाहुनी प्रिय वाटे मज

तिरंगा देशाची शान

उंच उंच फडकत राहो

वाटे मज अभिमान....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational