स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
मन पेटून उठते आज,
ऐकून स्वातंत्र्य शब्दांचा साज!
कुठे गेले स्वातंत्र्य ,शहिदांचा त्याग ?
कुठे हरवले ते दिवस , विझवण्यास आग ?
मिळविण्यास स्वातंत्र्य हजारो युद्धे झाली,
तेच स्वातंत्र्य टिकविण्यास मती मात्र हरवली.
सभ्य समाज होता नारीस माता मानी,
सुंदर अबला पाहता आज करे तिची हानी.
कसे दाखवावे कर्तुत्व शिक्षणाचा बाजार काळा?
पैशावाचून आज विद्यार्थ्यांपासून वंचित शाळा !
खेळ चाले समाजात आज तुझे तर उद्या माझे,
विकास कामाच्या नावावर ढोल-ताशे वाजे !
प्रगती होते कुणाची कळत नाही आम्हाला,
गरीब शेतकरी धडपडे पोटाची खळगी भरायला.
