STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

स्वातंत्र्य वीर सावरकर

स्वातंत्र्य वीर सावरकर

1 min
245

सावरकरांचा जन्म झाला 

तेव्हा भारतभूमी खुदकुन हसली

 ब्रिटिशांचे आता काही खर नाही 

म्हणून आनंदाने नाचू लागली


कुशाग्र बुद्धी,उच्च विचारसरणी

 वीर बहादूर सावरकर होते ओजस्वी कवी

 पोवाडे, लेख आणि कविता यांचा ध्यास

 जनजागृती करण्यासाठी टिळकांचा केला अभ्यास

स्वातंत्र्यलढ्याचे खरे प्रणेते,

 प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी


अंदमान येथील कारागृहात

बंदिस्त असूनही साक्षरतेचे

महान कार्य करणारे होते ते विद्वान, प्रचंड ज्ञानी


तुरुंगात अतोनात छळ

 होऊनी ही कधी ना खचणारे 

आधुनिक विज्ञाननिष्ठ 

दूर दृष्टिकोन ठेवणारे होते ते समाजसुधारक, देशप्रेमी

यंत्र हा शाप नसूनी

मानवास मिळालेले 

वरदान असे प्रतिपादन करणारे

तुरुंगात महाकाव्य रचणारे होते चिंतक, विचारक महाकवी 

स्वातंत्र्य लढ्यात अतोनात झटणारे वीर योद्धे, होते 

इतिहासकार, साहित्यकार, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी  

 

आपल्या विचारांना प्रत्यक्ष जगुनी ज्यांनी केले आत्मार्पण 

मातृभूमीसाठी दिले बलिदान केले सर्व समर्पण

 भारत मातेच्या या कणखर सुपुत्रास

 शतशः माझे नमन

क्रांतिवीर सावरकर यांना करिते

शब्दांजली सुमन अर्पण👏🙏



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational