STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

स्वातंत्र्य दिन-कविता

स्वातंत्र्य दिन-कविता

1 min
208

तिरंगी झेंडा हाती धरू या

वीर जवानांचे बलिदान स्मरू या 

बलिदानाची यशोगाथा वाचू या 

बालकांना त्यांची प्रेरणा देऊ या 


अनेक समस्या आपण उलगडू या 

बालमनास आपण पटवून देऊ या 

नव संशोधनास चेतना जागवू या 

बुद्धिकौशल्य पणास लाऊ या 


देशविकासाला हातभार लाऊ या 

मंत्र विकासाचा बालमनास देऊ या 

कार्य क्रांतीकारकांचे सांगू या 

रक्तरंजित क्रांतीचे स्मरण करू या 


 बेडी अधोगतीची आपण तोडू या 

विकासात्मक पाऊले सर्व टाकू या 

न्याय,समता,बंधूता पाळू या 

भारत देशाला बळकटी देऊ या 


इतिहास सत्याचा आपण शिकू या 

देश सुपुत्रांचे आदर्श विचार वाचू या 

त्यांच्या देशकार्यातून प्रेरणा घेऊ या 

सांडलेल्या रक्तातून क्रांती घडवू या 


अन्याय,अत्याचाराचा विरोध करू या 

देश विघातक शक्तीला धडा शिकवू या 

माणसाला माणूस समजू या 

पशूसमान वागणूक त्यास न देऊ या 


स्वातंत्र्य दिनाला शपथ घेऊ या 

सार्वभौम भारत एकता टिकवू या 

हक्क,कर्तव्ये समजून घेऊ या 

सुसंस्कृत ,साक्षर भारत घडवू या  


जाती,धर्म,पंथ,आदर राखू या 

शांतीचा संदेश सर्वांस देऊ या 

अखंड भारताचे स्वप्न साकार करू या 

बालमनाला ताकदवान शिक्षण देऊ या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract