Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

स्वातीचे मरणं टळे

स्वातीचे मरणं टळे

1 min
280


चिमुकल्या कावंडामळे रे

स्वातीचे मरणं टळे --------- ||धृ||


मोठया भावाने चपराक दिली

स्वाती रागाने रोडवर गेली

ट्रक वाल्यानं पळवून नेली

वर्ग मित्राच्या नजरी आली

अंत:करण त्यांचे कळवळे रे ----||१||


पहा त्या बंधूची चतुराई

याला क्षणाचा विलंब नाही

गाडी नंबर घेई घाई घाई

नव्हता कागद अन् पेन शाही

काडी हातावरी उगाळे रे ------- ||२||


केला क्षणात विचार बंधूने

घेई काडी नंबर कोरणे

बंधू गणेश रामासाने

रामेश्वर हो रामासाने

घाई घाई गावाकडे पळे रे ------||3||


चाकूरगावात बातमी गेली

रंगनाथ पित्याची धांदल झाली

शोध घेण्या फिरू लागली

सात विलासची लाभली

आई आक्रोशाने लोळे रे ------ ||४||


शोध नांदेड दिशेनं चाले

कणी नागपुर दिशेनं गेले

बंद केबिनीत स्वाती असे

नाही कुणाला कसी दिसे

अन्ना वाचून जीव तळमळे रे ----- ||५||


शोध घेतला त्या गाडीचा

पहारा त्यावर किन्नरचा

नजरा नजर पित्याची झाली

स्वाती गळ्यात मिठ्ठी घाली

नयन चित्याचे अश्रु ढाळे रे ------ ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy