STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

स्वाभिमान

स्वाभिमान

1 min
1.1K


स्वाभिमानाने रहायचं

स्वाभिमानानेच जगायचं

स्वाभिमान कधी नाही

चुकूनही गहाण ठेवायचं


स्वाभिमानी जीवन

आनंदात जगायचं

लहानपणापासून मुलांमध्ये

स्वाभिमान रूजवायचं....


विकत मिळत नाही

स्वाभिमान बाजारात

संस्कारमुल्ये ते अमुल्य

हळूहळू रूजवावं मुलांत ....


स्वाभिमानी माणूस

होत नसतो कधीच लाचार

अत्यंत स्वाभिमानी माणूस

पेरत असतो चांगले विचार......


स्वाभिमानी ठेवून बाणा

देशप्रेम ओथंबुन यावे

परक्या शत्रूसही पाहून

अंगावर काटा यावे......


अंत्यंत स्वाभिमानी होते

धर्मरक्षक वीर छत्रपती संभाजी

केले जरी तुकडे शरीराचे हजार

नाही विकला स्वाभिमान राजांनी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational