सूत्र रक्षाबंधनाच...
सूत्र रक्षाबंधनाच...
सूत्र रक्षाबंधनाच... कुणासाठी कुणाचं..
सूत्र रक्षाबंधनाचं... दृष्टी परिवर्तनाचं
दोन मनाच अतूट एक बंधन
जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या
हळव्या नात्यांच्या धाग्यावर
उमलणार अलवार स्पंदन
बहिणीच्या रक्षणार्थ सर्वत्र साजर केल जात रक्षाबंधन..
सूत्र रक्षाबंधनाच..
भावा बहिणीचा सण या परंपरेच्या चौकटीतून
बाहेर पडूया संकल्प करूया
साधा सरळ आणि सोपा
इतरांच्या सुखासाठी निसर्गाच्या रक्षणासाठी मोकळा करू या हृदयाचा
एक छोटासा कप्पा
मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली म्हणून खेद नको
जन्माला आली कन्या तर साजरा करावा आनंद सोहळा
विकृत दृष्टीने नाही तर
तिच्याप्रती पवित्र दृष्टी
ठेवून स्वतः सह इतरांचा ही तिच्या
विषयी मानसिकता आणि दृष्टिकोनही आतातरी बदलायला हवा
कृष्ण जसा द्रोपदीस तसा
नेत्राच्या निरंजनाने सदा सज्ज होऊन
रक्षाबंधन सारखा पवित्र सण सव॔त्र
साजरा करायला हवा
मानव आहे जबाबदार घालविण्यास वसुंधरेची शान
नाही निसर्ग पूजा नाही राहाला निसर्गाप्रती मान
निसर्गाच्या उदारतेची जाणीव म्हणून निसर्गाचा ठेवा
जपायलाच हवा वरदान निसर्गाचे मानवाला दुवा
झाड, झाडाचे कुटुंब आपल्यासाठी किती झटतात
झाडाचे सुंदर फूल, फळ आयुष्य रूपेरी व सुगंधित करणारे परिस्थितीवर
मात करण्याचे बळ आपल्याला देतात.. झाडाची गडद सावली होऊ देत नाही
कधी जिवाची लाही लाही
पक्की फांदी झाडाची सतत आधार देते, जाणीव होऊ देत नाही एकटेपणाची
भक्कम मूळ झाडाची जमिनीला घट्ट पकडून शिकवण देते आभाळभर फुलण्याची..
प्रतीकात्मक झाडांना राखी बांधून करुया
झाडांचे संगोपण अन् संवर्धन कारण
निसर्ग दातृत्व म्हणून सौंदर्याची उधळण करीत नेहमीच करीत असतो आपलं संरक्षण
संतप्त सूर्य जेव्हा उसळतो आपल्या
मुखातून तप्त ज्वाला
सुरू होतो जेव्हा उन्हाळा
या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी सुकतील
कंठ म्हणून शोधतात पशूपक्षी पाणी..
करून जीवाची लाही लाही
पक्ष्यांच्या या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देऊन ठेवू या
आपल्या अंगणात, माडीवर त्यांच्यासाठी मूठभर धान्य व वाटीभर पाणी...
दृष्टी परिवर्तन करून करूया त्यांचं रक्षण
त्यामुळे निसर्गाचं सुद्धा होईल संरक्षण...
पाणी देते प्रत्येक जीवास जीवदान
जगण्याला श्वासा इतका पाण्याचा आधार
अमृत रुपी पाण्याविना
सर्वांचा जीव होतो बेजार
करूया पाणी जतन करण्याचे
सर्वश्रेष्ठ काम
पाणी निसर्गाचे अनमोल रत्न पाणी वाचवण्यासाठी सर्वजण मिळून
करूया प्रयत्न
वेळ आहे आता काहीतरी करण्याची
आपल्या वसुंधरेला वाचवण्याची
निरोगी असेल वसुंधरा तर आरोग्य
सौख्य नांदेल घरा घरा
म्हणूनच वसुंधरेचे भक्षण न करता वसुंधरेचे करु या
रक्षण तिच्यामुळेच होत आहे आपले संरक्षण...
आता तरी सगळ्यांना समजावे
महत्व याचे
संकल्प करून मनापासून जतन करावे लागेल निसर्गाचे
हरवत चाललेल्या पर्यावरणाचा
रोखूया ह्रास
पर्यावरणाचे रक्षण करून थांबू या पर्यावरणाचा
होणारा विनाश..
जीवन जगताना साधं सोपं जगूया
लहानपणापासून सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांचा
सेवा करण्याचा थोडासा तरी
प्रयत्न करू या
आयुष्याचे हितगुज करून
एकमेकांशी संवाद साधू या
आपले बोट धरून चालायला शिकवलेल्या आई-वडिलांचा आधार बनून
मायने, प्रेमाने भरलेलं आभाळ घेऊन सावलीसारखे त्यांच्यासोबत राहून
सुखदुःखात सावरणारा हात होऊन सुंदर नाती जपून बंधन आयुष्याचे विणवू या
सूत्र रक्षाबंधनाचे एक अतूट बंधन म्हणून असंही जपू या
आपल्यासाठी, देशासाठी झटणाऱ्या
व्यक्तींसाठी जमेल ते करू या
शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त
खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं म्हणून
सामाजिक भान राखून सहजतेने
प्रत्येकाच्या हळूवार भावनांचा आधार बनून
अप्रत्यक्षपणे समोरच्याला सहकार्य करू या असंही
सूत्र रक्षाबंधनाच दृष्टी परिवर्तनाच आत्मसात करू या
सूत्र रक्षाबंधनाच कुणासाठी कुणाचं
मानलं तर वसुंधरेवरील जैविक अजैविक घटकाचं
सुजलाम-सुफलाम हिरव्यागार धरतीच्या
कल्पनेच्या पूर्णत्वाच...संगोपन आणि संवर्धनाच
फक्त आपल्या दृष्टी परिवर्तनाचं...🙏
