STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Inspirational

4  

Urmi Hemashree Gharat

Inspirational

सुर जुळता..

सुर जुळता..

1 min
341

सुर जुळता


दिसताच तु वळणावरती

गुलमोहर मनी फुलला

ग्रीष्मातही सोनेरी पारिजातक

सुगंधे वाटु लागला


प्रीतीच्या लोभस वाटा

खुणावती मजला ये ना

तुझाच वावर दिसता

हास्य ऊमटते बघ ना


सुर जुळता तुझ्याशी

जीव नादावला जरासा

भेटले तुजला नव्याने

ठेवुनी स्वप्नांवर भरोसा


साथ लाभली तुझी

संसारी सुख जिंकले

मळवट तुझ्या नावाचा

तुझ्यात मन गुंतले


सौ.ऊर्मी (हेमश्री )घरत.पालघर

8793621091



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational