STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Children

सुंदर सकाळ

सुंदर सकाळ

1 min
208

सकाळच्या उत्साहात 

अंधार पार झाला 

सरला सारा आळस 

आनंद मनात भरला 


सकाळचे कोवळे ऊन 

पसरे धरतीवर 

आनंदली धरतीमाय 

भास्कराचे उपकार 


सकाळच्या प्रहरी 

वाटा खाली,खाली 

पायी चालण्याची मजा 

मनाला भुरळ घाली 


आजूबाजूला झाडेवेली 

त्यावर पक्ष्यांची घरटी 

चिवचिवाट सारे करी 

जगण्याची जीवन राहटी 


भाषा पक्ष्यांची न्यारी 

कळे त्यांच्या पिल्लांना 

सारे एकत्र येऊन 

देई कष्टाची प्रेरणा 


झटकून आळस 

यश येते जीवनात 

ऊठा,ऊठा लवकर 

घ्या आनंद जगण्यात 


उशिराचे उठणे 

जीवनात भिकारपण 

उदासी जीवन 

मृतवत जगण्या समान 


आगळा आनंद ऋतूंचा 

ऊन,वारा,पाऊसाचा 

हेच खरे जीवन 

कष्टाच्या खऱ्या भाकरीचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract