सुखी माणसाचा सदरा
सुखी माणसाचा सदरा
येता संकट जरासे
हाती का घ्यावा कासरा
सोडा चिंता, सोडा काळजी
चेहेरा ठेवा ना हासरा
किती घेवू पोटात पाय
जाती अंथूरणा बाहेर
माझे जगणे लखलाभ मला
का देवू कुणा आहेर ?
जातो फाटक्यात पाय
अशा आमच्या चादरा
कुणी द्याल का हो मजला
सुखी माणसाचा सदरा ?
