Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

siddheshwar patankar

Abstract

3  

siddheshwar patankar

Abstract

सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे

सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे

1 min
353


सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात


तुम्ही हसा प्रसन्नतेने, मग बघा आजूबाजूला कशा चिता पेटतात?


तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही


तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही


त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं


वाया घालवत असतात वेळ, हळूहळू प्रारब्ध बदलत असतं


रोवूनीया झेंडे कैक, कैफ मिरविती एकमुखाने


एक हास्याची लकेर मात्र , सारं काही उधळत असतं !!


कोण कुणाच्या मनी वसला , तरीहि गवसत नाही कुणाला


फक्त एका हर्ष होता, सारे बैसती पुसत दुःखाला


षड्रिपूंच्या विळख्यात सारे ऎसे काही गुरफटलेले


बघा इथे ओ पूर आला, जो तो संगे वाहत गेला


विचारले मी त्याला, हसण्याचे कारण ओ कैसे ?


तो उत्तरला उत्तर देउनी, वेड लागले मला जरासे


या वेडातच दुनिया सारी , दुःखीकष्टी झाली भारी


हासुनिया त्याने पेटवल्या , चिता सर्वदूर घरोघरी



Rate this content
Log in