STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance Inspirational

3  

Sanjana Kamat

Romance Inspirational

सुखाची सरी

सुखाची सरी

1 min
213

सुखाच्या सरी,स्वप्नाचे पाझर,

तारूण्याची झालर.

हौसमौज आणि कहर,

जीवनात येतो घेऊन बहार.


सुखाची सरी,अनमोल जरी

असते प्रेमाच्या भेटीस आतूर.

जरी थोडीे खट्याळ, अन उनाड,

फुलविण्या येतो, प्रितीस मोहर.


सुखाच्या सरी,जुळविते नाती,

गुंतून,रंगते,प्रेमात अपरंपार.

कधी होकार,कधी नकार,

मिलनास काहुर,अन झंकार.


सुखाच्या सरी,शिंपल्यातील मोती,

घेऊन आला नवनवे सण सोहाळे,

विसरविण्या आले दुःखाचे क्षण,

रंगविले मोहक सुंदर चित्र वेगळे.


सुखाच्या सरी, स्वप्न झेप भरारी,

येऊ दे लवकर माझ्या घरी.

बाळ असेल की सुंदर परी,

ओढातून निघती काव्यांचा लहरी.


सुखाची सरी,बालपणीचे खेळ,

हसत,खेळत,मायबपाच्या कुशीत.

कधी स्वप्ने पुरती ती शोधत,

ठाऊकच नव्हते दुःखाचे गणित.


नको थोरपण,बालपणच बंर

होते निर्मळ सारे जग हे प्रेमळ.

जगाने शिकवले शहाणपण,

कळलेच नाही,चटके सोसण्यातले बळ.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance